रावेरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणार -नूतन निरीक्षक रामदास वाकोडेंची ग्वाही

0

रावेर- रावेर पोलिस ठाण्यात नूतन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी मंगळवादी पदभार स्वीकारला. तत्कालीन पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांची पदोन्नतीवर बदली झाल्याने सुमारे महिना भरापासून पद रीक्त होते. मंगळवारी धरणगाव येथून बदलून आलेले रामदास वाकोडे यांनी पदभार स्वीकारला. वाकोडे यांनी यापूर्वी नागपूर, भिवंडी, वसई, मीरा-भाईंदर, सासवड शिरूड खंडोबा-जेजुरी या ठिकाणी सेवा बजावली आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास आपले प्रथम प्राधान्य राहणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी आपले प्रयत्न असतील शिवाय गुन्हेगारी ठेचून काढू, असे नूतन निरीक्षक रामदास वाकोडे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.