रावेर: शहरातील स्वामी विवेकानंद चौकातील रहिवासी असलेल्या विवाहिता मंगलाबाई संतोष महाजन (34) यांनी राहत्या घरी बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. विवाहितेच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परीवार आहे. संदीप रमेश महाजन यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील करीत आहेत.