Private Toilet Corruption Case in Rawer : Six accused in jail रावेर : रावेर पंचायत समिती अंतर्गत वैयक्तिक शौचालय लाभ प्रकरणात सुमारे दिड कोटींचा अपहार झाला होता. या प्रकरणी यापूर्वीच बड्या अधिकार्यांसह 18 संशयीतांना अटक करण्यात आली असतानाच रावेर पोलिसांनी कुसुंबा, लुमखेडा व उदळी येथून सहा आरोपींना अटक केल्याने भ्रष्टाचार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या आता 24 वर पोहोचली आहे. वैयक्तिक शौचालया झालेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण मुंबईतील अधिवेशनात पोहोचले आहे.
या आरोपींना अटक
भ्रष्टाचार प्रकरण रावेर पोलिसांनी कामील जमील खान (35, लुमखेडा), शेख आरीफ शेख रईस (29, उदळी), फिरोज जमील खान (40, लूमखेडा), आदम जहानखा तडवी (37, कुसुंबा खुर्द), रमेश सुभान तडवी (40, कुसुंबा खुर्द), अरबाज फिरोज खान (21, लुमखेडा) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, सायंकाळी उशीरा संशयीतांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक म्हणाले.