रावेरातून अल्पवयीन मुलीस पळवले

रावेर : तालुक्यातील अजनाड येथील अल्पवयीन तरुणी रावेर येथील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये अकरावीचा प्रवेश घेण्यासाठी आल्यानंतर अज्ञातांनी तिला फूस लावून पळवून नेले. ही घटना मंगळवार, 12 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पीडीत मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.