रावेरात कनिष्ठ लिपिकासह तिघांना शिविगाळ

रावेर : शहरातील सरदार जी.जी.हायस्कूलमध्ये एकाने शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
संशयीत ईश्वर महाजन यांनी सरदार जी.जी.हायस्कूलमधील कनिष्ठ लिपिक नरेंद्र नथू माळी व योगेश भट राजू महाजन व भास्कर गुरव यांना सोमवार, 26 रोजी दीड वाजता स्कॉलरशीप परीक्षेच्या फॉर्म भरण्याच्या कारणावरून हुज्जत घालून अश्लील शिवीगाळ करीत धमकी दिली. यावेळी उपस्थित शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित समजावण्याच्या परिस्थितीत नसल्याने माळी यांच्या फिर्यादीवरून ईश्वर महाजन विरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ईस्माईल शेख करीत आहेत.