रावेरात कॅरीबॅग विक्रेत्यांवर कारवाई

0

मुख्याधिकार्‍यांची कारवाई; आठ हजारांचा दंड वसुल

रावेर– प्लॅस्टीक पिशव्यांमुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास लक्षात घेता मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे यांनी स्वतः गुरुवारी स्वतः शहरात फिरून प्लॅस्टीक कॅरीबॅग विकणार्‍या होलसेल तसेच किरकोळ दुकानांची तपासणी करीत आठ हजारांचा दंड वसुल केला. या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. यापुढे अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी म्हणाले.