रावेरात कोरोनाचा फैलाव : यंत्रणेत समन्वयाबाबत पदाधिकार्‍यांचे निवेदन

0

रावेर : रावेर तालुक्यात जीवघेणा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचीच दखल घेत सोमवारी सर्वपक्षीय राजकीय पदाधिकार्‍यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देऊन कोरोना व्हायरस संदर्भात खबरदारी घेण्यासाठी तसेच सर्वसाधारण जनता, प्रशासन, राजकीय पदाधिकारी आदींनी समन्वय ठेवून कार्य करण्याची मागणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, शिवसेना तालुका संघटक अशोक शिंदे, दिलीप कांबळे, नगरसेवक सुरज चौधरी, देविदास महाजन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, बाळु शिरतोळे, दिलीप शिंदे, ई.जे.महाजन आदी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

प्रशासनाकडून अश्या आहेत अपेक्षा
स्वॅबचे रीपोर्ट तातडीने उपलब्ध करावे, सोशल डिस्टन्सींग संदर्भात प्रचार प्रसार करावा, दुकानांमध्ये गर्दी होत आहे. त्यावर कारवाई करावी, कोरोनाचे माहिती पत्रक गावात लावावे, विलगीकरण कक्षात सोयी-सुविधा पुरवाव्यात, शहरात प्रचंड गर्दी होत असून शहराबाहेर पार्किंगची व्यवस्था करावी, कोविड सेंटरवर व्हेंटीलेटर उपलब्ध करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.