रावेरात घरफोडी : 50 हजारांची रोकड लंपास

रावेर : रावेरचे नूतन निरीक्षक कैलास नागरे यांना चोरट्यांनी सलामी देत बंद घरातून 50 हजारांची रोकड लांबवली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक कॉलनीतील रहिवासी तडवी हे बाहेर गावी गेले असल्याने त्यांचे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 3 ते 11 सप्टेंबरदरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून पन्नास हजार रुपयांची रोकड लांबवली. रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांचा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.