रावेरात नियमांचे उल्लंघण : 75 नागरीकांवर कारवाई

0

रावेर : लॉकडाऊनच्या कालावधीत नियमांचे उल्लंघण करणार्‍या 75 नागरीकांवर येथे प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रावेर शहरात मास्क न घालणार्‍या 48 नागरीकांवर तर सोशल डिस्टन्स न ठेवणार्‍या 27 नागरीकांवर कारवाई करण्यात आली व या माध्यमातून 39 हजार 900 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भागवत धांडे व जितेंद्र नारेकर यांनी केली.

नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढतच असून कोरोना ही महामारी आवाक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरीकांनी स्वतः ची व दुसर्‍याची सुरक्षा ठेवण्याकरीता नियमांचे पालन करणे गरजेचे असून मास्क लावण्यासह सोशल डिस्टन्स ठेवावे व विनाकारण फिरू नये अन्यथा यापुढे आणखी कडक कारवाई करण्यात येईल तसेच अंत्यविधीकरीता फक्त 15 लोकांनी व लग्न समारंभास 50 नागरीकांनाच परवानगी असून पंगत सुद्धा सर्व नियमांचे पालन करूनच द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. नियमांचे पालन न करणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करून सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.