रावेर : सर्वांना संधी दिली जाते, मग मलाच का डावलले जाते ? असा प्रश्न उपस्थित करीत रावेर पंचायत समिती सदस्या योगीता वानखेडे या खासदार रक्षा खडसे यांच्याशी बोलत असताना त्यांना रडू कोसळले. तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनावेळी हा प्रकार घडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
यांची होती उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परीषद सदस्य तथा सेवा व समर्पण अभियानाचे जिल्हाप्रमुख नंदकिशोर महाजन, उत्तर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष सुरेश धनके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, माधुरी नेमाडे, जुम्मा तडवी, बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हाध्यक्ष सारीका चव्हाण, सरचिटणीस महेश चौधरी, माजी उपसभापती सुनील पाटील, महेश पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे, शहराध्यक्ष दिलीप पाटील, रजनीकांत बारी आदी यावेळी उपस्थित होते.
रावेरातून सेवा व समर्पण अभियानाची सुरुवात
रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या आवारात खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते गरजु लोकांना किराणा किट्स वाटप करण्यात आले व अपंग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी किसान जवान सन्मान दिवस म्हणुन भारतीय जनता पार्टीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
तालुका वैद्यकीय कार्यालयाचे उद्घाटन
खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते तालुका वैद्यकीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चिनावल येथील वैद्यकीय कार्यालय कायम स्वरूपी रावेरात आले असून यासाठी विद्यमान पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्यानी विषय लावून धरला होता.