रावेर: विविध न्याय मागण्यांसाठी प्राध्यापक संघटनेतर्फे शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजेयकुमार ढगे यांना देण्यात आले. आंदोलनात प्रा.शैलेश राणे, व्ही.व्ही.पाटील, अरुण राठोड, जी.टी.पाटील, आर.आर.महाजन, वाय.डी.अकोले यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील प्राध्यापक उपस्थित होते.