रावेर : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिलेली आहे. या अनुषंगाने सोमवारी रावेरात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षासह संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्तीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन केले. बंदला रावेर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमूद शेख, काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, योगराज पाटील संभाजी बिग्रेडचे विनोद चौधरी, मोरेश्वर सुरवाडे, प्रहार जनशक्तीचे अविनाश पाटील, मानसी पवार, पंकज वाघ, अनिल पाटील, गयास काझी, सोपान पाटील, संतोष पाटील, सावन मेढे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद
महाराष्ट्र बंदला रावेर शहरात अल्प प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी रावेर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर दुकानदारांनी दुकाने बंद केली मात्र काही वेळातच दुकाने सुरू झाल्याचे चित्र शहरात दिसून आला.