रावेरात मोबाईलचा स्फोट : राष्ट्रवादी शहरध्यक्ष थोडक्यात बचावले

रावेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर शहराध्यक्ष महेमुद शेख यांचा रेडमी कंपनीचा मोबाईलचा गुरुवारी अचानक स्फोट झाल्याने शहर व परीसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने मोबाईल पँटच्या खिशात असल्याने कोणतीही दुखापत झाली नाही.

नेमके कारण अस्पष्ट
रेडमी 10 कंपनीचा मोबाईल खिशात ठेवल्यानंतर गुरुवारी सकाळी फिरण्यासाठी निघालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर शहराध्यक्ष महेमुद शेख यांना अचानक खिशातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचीही विलंब न करता मोबाईल बाजूला फेकला व काही वेळेत मोबाईलचा मोठा स्फोट झाला.
थोडक्यात बचावले आहे.यामुळे मोबाईल वापरकर्तेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.