रावेर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ रावेरातील भाजपा पदाधिकार्यांनी मंगळवारी सायंकाळी स्टेशन रोडवर रास्ता रोको करीत अटकेच्या कृतीचा निषेध केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चाचे संपर्क प्रमुख सुरेश पूना, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख नितीन पाटील, संदीप सावळे तसेच 20 ते 25 कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका पोलिसांनी यावेळी बंदोबस्त राखला.