रावेरात शासकीय पासेस असणार्‍यांनाच द्यावे पेट्रोल

0

तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या सूचना : प्रशासकीय तसेच धान्य व्यापार्‍यांचीही बैठक

रावेर : रावेर तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलमध्ये दिवसभर बैठका झाल्या. यामध्ये पेट्रोल पंप चालक, प्रशासकीय,आणि धान्य व्यापारां-या बैठका घेण्यात आल्या. यामध्ये वेग-वेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या दालनात पेट्रोल पंप चालकांची बैठक झाली. यामध्ये तहसीलदार यांनी शासनाकडून ठरवुन दिलेल्या अटी-शर्ती व शासकीय पासेस असणा-यांनाच पेट्रोल देण्याचे अवाहन त्यांनी केले.

कोरोना संदर्भात झाली प्रशासकीय बैठक
यानंतर कोरोना व्हायरस संदर्भात प्रशासकीय महत्वाची बैठक झाली. यामध्ये तहसीलदार यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत बीडीओ सोनिया नाकाडे, सीईओ रवींद्र लांडे, जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी महाजन, शिवराज पाटील आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

धान्य व्यापार्‍यांची घेतली बैठक
या नंतर सर्वात शेवटी शहरातील धान्य व्यापार्‍यांना बोलावून कोरोना या महाभयंकर व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने गरीब कुटुंबाना धान्य वाटप करता यावे यासाठी त्यांना सहकार्य करण्याचे अवाहन करण्यात आले.