रावेराला एकाला मारहाण करीत तरुणीने काढली धिंड

0

छेडखानी केल्याचा संशय; संशयीत रावेर पोलिसांच्या ताब्यात

रावेर– शहरातील एका तरुणीचे नाव घेतल्याच्या कारणावरून एकाला तरुणीनेच शहरातून धिंड काढत चोपल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली. पीडीत तरुणीशी अश्‍लील वर्तन आरोपीने केल्याचा आरोप आहे. या नंतर संतप्त झालेल्या तरुणीने विनायक धनसिंग पाटील या संशयीतास चांगलेच चोपले. एका चहाच्या दुकानापासून संशयीताची धिंड काढत चोपत-चोपत त्यास रावेर पोलीस ठाण्यापर्यंत आणले. या प्रकारानंतर अन्य महिलांसह जमावातील काहींनी विनायक पाटील याच्यावर हात साफ करून घेतला. रावेर पोलीस पीडीत तरुणीकडून आपबिती ऐकून घेत असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी सांगितले.

उपनिरीक्षकावर ट्रॅप करणारा संशयीत
रावेर पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणारा संशयीत असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी दहा हजारांची लाच घेताना निकाळजे यांना जळगाव एसीबीने पकडले होते.