रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डी.सी.पाटील

0

रावेर- रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डी.सी.पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. तत्कालीन सभापती राजीव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रीक्त झालेल्या पदासाठी निवडणूक झाली. त्यात पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक डी.बागल यांनी काम पाहिले. त्यांन गोपाळ महाजन यांनी सहकार्य केले.

यांची होती उपस्थिती
उपसभापती कैलास सरोदे, सदस्य नीळकंठ चौधरी, अरुण पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, राजीव पाटील, गोपाल नेमाडे , गोंडू महाजन, विनोद पाटील, प्रमिला पाटील, कल्पना पाटील, पितांबर पाटील, प्रमोद धनके, श्रीकांत महाजन, उरमान तडवी, योगेश पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, डी.सी.पाटील यांच्या निवडीनंतर जिल्हा परीषद उपध्यक्ष नंदकिशोर महाजन, अनिल चौधरी, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, संजय गांधी निराधार अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शिरीष वाणी, डॉ.सुभाष पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी, रमेश पाटील, यादवराव पाटील यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.