रावेर ग्रामीणचा महिनाभरात सुटणार तिढा

0

जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन: स्वतंत्र ग्रामपंचायत वा पालिकेत समाविष्ट होणार भाग

रावेर: रावेर ग्रामीण परीसराचा महिनाभराच्या आतच स्वतंत्र ग्रामपंचायत वा पालिकेत समावेश करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकार्‍यांनी भेटीप्रसंगी शुक्रवारी दिली. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर रावेर ग्रामीण भागातील नागरीक सोयी-सुविधांपासून वंचित असल्याने त्याबाबत तिढा सोडवण्यासाठी रावेरात दाखल झाले होते. त्यांनी रावेर ग्रामीण भागातील नागरीकांसह पालिकेच्या कर्मचार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. पंचायत समिती नगरपालिका, महसूल व रावेर ग्रामीण भागातील नागरीक प्रसंगी उपस्थित होते. प्रसंगी जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामीण परीसराची पाहणी करून समस्या जाणल्या तसेच रावेर पालिकेला भेट दिली.