रावेर- रावेर तालुका फोटोग्राफर बहुउद्देशीय संस्था तालुका अध्यक्षपदी गणेश महाजन तर उपाध्यक्षपदी सुनील महाजन तर सचिवपदी योगेश नन्नवरे यांची निवड करण्यात आली. सरदार जी.जी.हायस्कूल कॉम्पलेक्समध्ये रावेर तालुका फोटोग्राफर बहुउद्देशीय संस्थेची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी गणेश महाजन, उपाध्यक्षपदी सुनील महाजन तर सचिवपदी योगेश नन्नवरे, सहसचिव गजानन चौधरी यांची निवड करण्यात आली.
यांचा सदस्यांमध्ये समावेश
सदस्यपदी तुषार मानकर, यशपाल परदेशी, उमेश कोळी, आकाश भालेराव, चंद्रकांत पाटील, मयुर पाटील, संजय महाजन, शरद महाजन, प्रवीण पाटील, संतोष नवले, राहुल महाजन, गोकुल महाजन, शेख इम्रान शेख महेबूब यांची निवड करण्यात आली. प्रसंगी फोटोग्राफर राज चंदनकर, निलेश नन्नवरे, चेतन परदेशी, लुकमान तडवी, निलेश दलाल, भैय्या चौधरी, दीपक भामरे, स्नेहल अट्रावलकर, प्रमोद पाटील, जितेंद्र चौधरी, निलेश पाटील, समाधान महाजन, हितेश शिंदे, विक्की मोरे, मयुर कासार, रवींद्र महाजन आदी उपस्थित होते.