रावेर । तालुक्यातील सहस्त्रलिंग येथील वनपरिसरात अचानकपणे आग लागून गवतासह सुकलेली झाडे जळाल्याची घटना बुधवारी 12 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. येथील पाल- रावेर रस्त्याने जाणार्या प्रवाशांना हि आग दिसताच त्यांनी बाजूलाच असलेल्या ग्रामपंचायत परिसरातून पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे दिसताच वनविभागाला याबद्दल माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकार्यांनी लागलीच सावदा नगरपालिकेच्या अग्नीशमन दलास पाचारण केले. अग्नीशमन दलासह वनविभागाच्या कर्मचार्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.