रावेर- महागाईच्या भस्मासुराने जनता त्रस्त असून मजुरांच्या हाताला काम नाही, पावसाने ओढ दिली असून इंधनाचे वाढत जाणारे सातत्याने दर पाहता
जनतेच्या रोषाची सरकारने वाट पाहता तातडीने तालुक्यात दुष्काळ जाहीर करवा अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी तहसील प्रशासनाला मंगळवारी निवेदनाद्वारे दिला.
विविध मागण्यांबाबत प्रशासनाला साकडे
वाढत्या महागाई संदर्भात काँग्रेसतर्फे मंगळवारी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. भारनियम तत्काळ बंद करावे, लाल्या पडलेल्या कपाशीचे तत्काळ पंचनामे करावेत, उडीद, तूर, मूग पावसाअभावी पूर्णपणे वाया गेली असून त्याबाबत तत्काळ पंचनामे करावेत, शेतकर्यांच्या माल हमीभावाने प्रमाणे खरेदी करावा, पेट्रोल-डिझेलचे भाव तत्काळ कमी करावेत, बेरोजगारांना महागाई भत्ता द्यावा, ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना जिल्हा परीरषद सदस्या सुरेखा नरेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, बाजार समिती माजी सभापती डॉ.राजेंद्र पाटील, यशवंत धनके, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, दिलरुबाब तडवी, डॉ.धनंजय महाजन, रामदास लहासे, गफूर तडवी, संजय चौधरी, सुरेश पाटील, मधुकर महाजन, सूर्यभान चौधरी, नरेंद्र पाटील, दिलीप पाटील, डी.एन.महाजन, ब्रिजलाल पाटील, शेख अय्यूब मेंबर, डॉ.शब्बीर, अमजद तडवी, संतोष पाटील तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.