रावेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचे चार रुग्ण आढळले

0

रावेर : तालुक्यात पुन्हा चार कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. दिवसें-दिवस तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढत असून नागरीकांच्या काळजीत भर पडली आहे. रावेर शहरात एक कोरोना पॉझीटीव्ह आढळला असून चिनावल येथे दोन तर वाघोदा खुर्द येथे एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळला आहे. तहसीलदार अउषाराणी देवगुणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. रुग्ण राहत असलेला भाग कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आतापर्यंत रावेर तालुक्यात एकूण 20 कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली.