निळे निशाण व संभाजी ब्रिग्रेडचे संयुक्त प्रयत्न
रावेर : कोरेगाव-भीमा येथे घडलेली घटना निश्चितच निंदणीय आहे मात्र तोड-फोड करणे, सामाजिक स्वास्थ बिघडवणे हा त्यावर उपाय नसून अशा अप्रिय घटना घडणार नाहीत यासाठी दोन्ही संघटना मिळून प्रयत्न करण्याचे काम रावेर तालुक्यातील निळे निशाण सामाजिक संघटना व संभाजी ब्रिग्रेड रावेर यांच्या माध्यमातून केले जात असून कोरेगाव-भीमा येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळुन निघाला परंतु रावेर तालुक्यात या दोन्ही संघटनांच्या माध्यमूुन कोणतीही अबाधीत घटना घडू देण्यात आली नाही व यापुढे अशाचप्रकारे तालुक्यात या पुढेही सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम केले जाईल, अशी माहिती नवीन विश्रामगृहावर झालेल्या निळे निशाण व संभाजी ब्रिग्रेडच्या संयुक्त पत्रकार परीषदेत देण्यात आली.