शाळांचा सन्मानचिन्ह देऊन लवकरच होणार गौरव
रावेर- रावेर पंचायत समितीतर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जिल्हा परीषद शाळांमधून प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद शाळांसाठी नावीन्यपूर्ण ‘बेस्ट डीजिटल स्कूल स्पर्धा 2017-18’ चे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रातून केंद्रप्रमुख यांचे मार्फत परीक्षण करून शाळांची निवड करण्यात आली असून निकाल घोषित करण्यात आला आहे. लवकरच या शाळांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.
तालुक्यातील बेस्ट डीजिटल स्कूल अशा
जिल्हा परीषद शाळा कळमोद, कुंभारखेडा, मोरव्हाळ, शिंदखेडा, तांदलवाडी, थोरगव्हाण, केर्हाळे बु.॥, अजनाड, रोझोदा, धूरखेडा, निंबोल, वाघाडी, उटखेडे, विवरे, गहुखेडा (उत्तेजनार्थ). या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी, रवींद्र सपकाळे यांच्यासह सर्व केंद्रप्रमुखांनी परीश्रम घेतले.