रावेर : रावेर ग्रामीण रुग्णालयात गेल्या 24 तासात चार महिलांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. 15 रोजी रावेर ग्रामीण रुग्णालयात मागील 24 तासात चार महिलांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू ओढवला. त्यात कोचुर येथील 67 वर्षीय महिलेसह वाघोदा येथील 65 वर्षीय महिला, ऐनपूर येथील 63 वर्षीय तर रावेर येथील 66 वर्षीय महिलेचा समावेश आहे. रविवारी सकाळीदेखील पुन्हा ऐनपूर येथील एका महिलेला रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता मृत घोषीत करण्यात आले. तालुक्यात सध्या 26 रुग्ण ग्रामीण रुग्णालयात अॅक्टिव असून 28 रुग्ण कोरोना सेंटरमध्ये दाखल आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन म्हणाले की, रावेर ग्रामीण रुग्णालयात आलेले रुग्ण अखेरच्या क्षणी उपचाराले आणले गेले. आधी 40 वर रुग्ण होते मात्र ही संख्या आता कमी झाली असून ती आता 25 च्या जवळ आहे. तालुक्यचा रीकव्हरी रेट सुध्दा 85 टक्क्यांवर वर आहे. ही आशादायक बातमी असून जनतेनेेदेखील काही लक्षणे जाणवताच ताबडतोड चाचणी करून उपचारासाठी येथे दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रशासकीय टीमला सलाम
दरम्यान कोरोना व्हायरस सारखी महामारी सर्वत्र हाहाःकार माजवत असतांना तालुक्यात रुग्ण नियंत्रणात आणण्यासाठी रावेर शहरात मुख्याधिकारी रवींद्र लांडे सतत शहरात फिरून काम करताय तर रावेर ग्रामीण भागातमध्ये गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल या सतत फिरून प्रतिबंधक क्षेत्रात भेटी देत आहेत. शहरात गर्दी होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे सुध्दा अहोरात्र काम करीत आहे व विना मास्क फिरणार्यांना दंड करीत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, डॉ.शिवराय पाटील देखील शासन आदेशाचे अंमलबजावणी करून रुग्ण सेवा बजावत आहे. या सर्वांच्या पुढाकाराने तालुक्यात रीकव्हरी रेट 85 टक्क्यांवर असल्याचे समाधान आहे.
जिल्हाधिकार्यांनी करावा रावेर दौरा
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेर तालुका दौरा करण्याची भावना सुज्ञ नागरीकांमधुन होत आहे. कोरोना संदर्भात उपाययोजनांची प्रत्यक्षात जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी तसेच रावेर पुरवठा विभाग खुप जिल्हाभर गाजतोय त्यामुळे या सर्व गोष्टीच्यावॉश आऊटसाठी रावेर दौरा करण्याची मागणी होत आहे.