रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अ‍ॅड.सुरज चौधरी बिनविरोध

0

निवडीनंतर पदाधिकार्‍यांचा जल्लोष : नूतन पदाधिकार्‍यांची शहर विकासाची ग्वाही

रावेर- रावेर नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अ‍ॅड.सुरज चौधरी यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी नंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोलताशांच्या गजरात जोरदार जल्लोष केला. नगरपालिका सभागृहात पीठासन अधिकारी तथा चोपडा येथील तहसीलदार दीपक गिरासेे होते. उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक अ‍ॅड.सुरज चौधरी यांचा एकमेेेेव उमेेेेदवारी अर्ज आल्याने अ‍ॅड चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी यांनी केली. निवड प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी रवींद्र लांडे, आरोग्य निरीक्षक धोंडु वाणी, पांडुरंग महाजन यांनी सहकार्य केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, गटनेते आसीफ मोहंमद, नगरसेवक प्रल्हाद महाजन, मावळत्या उपनगराध्यक्षा संगीता अगरवाल, नगरसेवक सुधीर पाटील, असदुल्लाखान, शेख सादिक, यशवंत दलाल, राजेद्र महाजन, प्रकाश अग्रवाल, जगदीश घेटे, पार्वताबाई शिंदे, ललिता बर्वे, संगीता वाणी, नुसरत यास्मीन शेख, हमीदाबी पठाण, रंजना गजरे, संगीता महाजन आदी नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी तसेच विजय गोटीवाले, विजय मनवानी, डॉ. अनंत अकोले, अ‍ॅड.एम.ए.खान, मुन्ना अगरवाल, सोपान पाटील, भास्कर महाजन, विलास चौधरी, गोपाल चौधरी, भास्कर महाजन, हिरामन चौधरी, पंकज चौधरी, नारायण चौधरी, भगवान चौधरी, पांडुरंग चौधरी, अ‍ॅड.आर.एन.चौधरी, अ‍ॅड.मधुसदन चौधरी, अ‍ॅड.प्रमोद विचवे, अ‍ॅड.सलीम तडवी, दिलीप शिंदे, राजेश पांडे आदी उपस्थितांनी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सुरज चौधरी यांचा सत्कार करून अभिनंदन केले.