15 हजारांच्या पीआर बॉण्डवर सुटका ; 300 रूपयांचा सुनावला दंड
रावेर:- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपा पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात वारंवार गैरहजर राहणार्या आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयाने सांताक्रुझ पोलिसांना दमानिया यांना अटक करण्याबाबत वॉरंट बजावले होते. सोमवारी दमानिया न्यायालयात हजर झाल्या व स्वतः त्यांनी आपली बाजू न्या.डी.जी.मालवीय यांच्याकडे मांडली. यावेळी तक्रारकर्त्यांचे वकील अॅड.चंद्रजीत पाटील यांनी दमानिया या प्रत्येक वेळी न्यायालयात हजर राहत नाही त्यामुळे त्यांना पीआर बॉण्डवर सोडू नये, अशी बाजू मांडत वॉरंट कॅन्सल करू नये, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने दोघा बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर दमानिया यांना 300 रुपये दंड सुनावला व 15 हजारांच्या पीआर बॉण्डवर त्यांची सुटका केली.