रावेर : रावेर पंचायत समितीत तीन कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे तसेच दोन कर्मचार्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंचायत समितीचे कामकाज खिडकीद्वारे चालवण्यात येत असून ग्रामीण जनतेने अत्यंत अर्जंट काम असेल तरच पंचायत समितीमध्ये येण्याचे अवाहन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी केले आहे.
आतापर्यंत 110 रुग्णांचा मृत्यू
रावेर तालुक्यात सध्या दोन हजार 920 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 110 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रावेर पंचायत समितीत तीन कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह आले आहे तर दोन कर्मचार्यांच्या कुटुंबातील सदस्य पॉझीटीव्ह आहेत. मंगळवारी दिवसभर पंचायत समितीचे कामकाज खिडकीद्वारे चालवण्यात आले. पंचायत समितीच्या गेटवर येणार्या प्रत्येकाची तपासणी करण्यात आली. गटविकास अधिकारी किंवा सभापती उपसभापती यांना कामा निमित्त भेटण्यासाठी येणार्यांना एक-एक करून सोडण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर कोरोना समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. विना मास्क फिरणार्यांवर दंड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. काम असेल तरच बाहेर फिरण्याचे आवाहन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी केले आहे.