खासदार रक्षा खडसेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे : लवकरच निधी देण्याचे आश्वासन
रावेर- लोकसभा मतदार संघातील चोपडा, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, भुसावळ, वरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर, नांदुरा, मलकापूर, शेंदूर्णी या नगरपंचायत व नगरपरीषदेच्या हद्दीत रस्ते, गटारी, हायमास्ट लॅम्प इतर सुविधांसाठी खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे सुमारे 30 कोटी रुपयांचा निधीची मागणी केली. या मागणीस मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन दिले. रावेर लोकसभा मतदारसंघातील यावल, रावेर, फैजपूर, सावदा व चोपडा या नगरपालिका क्षेत्राच्या जवळच्या भागात बरीचशी लोकसंख्या वाढलेली आहे परंतु ह्या वस्त्या नगरपालिका हद्दीत येत नसल्यामुळे तिथे मूलभूत व गरजू सुविधा पुरविणे नागरपालिकेस शक्य होत नसल्याने या नगरपालिकांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा या विनंतीस मुख्यमंत्री यांनी सदर बाबीत आढावा घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देऊ, असे आश्वासन दिले.