रावेर लोकसभेत खासदार रक्षा खडसेंनाच मिळणार संधी ?

0

सट्टा बाजार जोमात ; निवडणुकीसाठी गावो-गावी लागल्या पैजा

भुसावळ- रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी शांततेत निवडणूक पार पडल्यानंतर सायंकाळनंतर ठिकठिकाणी या मतदारसंघातून आता कोण विजयी होणार? या विषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. विविध विकासकामांच्या जोरावर खासदार रक्षा खडसे यांनी मतदारांना आशीर्वाद मागितले होते तर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी घराणेशाहीचा वारसा ऐवजी सेवेचा वारसा म्हणत दंड थोपटून भाजपा सरकारवर टिका करीत मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी संधी देण्याची विनंती केली होती. दोन्ही तुल्यबळ उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवल्यानंतर प्रत्यक्षात आता निवडणुकीअंती कोण विजयी होणार ? याबाबत चर्चा रंगत असतानाच रावेर मतदारसंघातून खासदार खडसेंना पुन्हा संधी मिळणार असल्याचा आशावाद मतदार व्यक्त करीत आहेत शिवाय त्याबाबत ठिकठिकाणी पैजादेखील लावण्यात आल्या आहेत. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील निवडून आल्यास एक रुपयांना दहा रुपये याप्रमाणे सट्टा बाजारात भाव सुरू आहे मात्र खासदार खडसे यांच्याबाबतीत सटोडिया रीस्क घ्यायला तयार नसल्याने त्यांचा विजय निश्‍चित असल्याची चर्चा जाणकारांमध्ये ऐकायला येत आहेत.