रावेर व यावल तालुक्यातील शेकडो बांधकाम कामगार आर्थिक सहाय्याच्या प्रतीक्षेत

0

खिर्डी : राज्यात जवळपास 12 लाख मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती मात्र अद्याप रावेर-यावल तालुक्यातील शेकडो बांधकाम कामगारांना या रकमेची प्रतीक्षा आहे.

कामगारांवर आली उपासमारीची वेळ
कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन 17 मे 2020 पर्यंत घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झाली असल्याने बांधकाम कामगारांना दररोज रोजगार मिळत नाही त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या दोन्ही तालुक्यात हातावर पोट भरणार्‍या बांधकाम कामगारांना सध्या काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या तालुक्यातील बांधकाम कामगार लॉकडाऊनमुळे घरीच बसले असून या दोन हजार रुपये आर्थिक सहाय्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे मात्र दोन हजार रुपये लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

तातडीने अर्थसहाय्यक मिळण्याची अपेक्षा -साबीर बेग
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कामगार मंत्री सह इतरांनी घेतलेला निर्णय बांधकाम कामगारांसाठी दिलासा दायकच आहे. मात्र अशा परीस्थितीत बांधकाम कामगारांबद्दल घेतलेला हा निर्णय कौतुकास्पदच आहे मात्र आर्थिक सहाय्य रावेर व यावल तालुक्यातील बांधकाम कामगारांना लवकरात लवकर मिळावे ही प्रशासनाकडून अपेक्षा असल्याचे धडक कामगार युनियन रावेर तालुकाध्यक्ष साबीर बेग म्हणाले.