रावेर- शहरात सुध्दा दोन घरफोड्या झाल्या असून त्यात सुमारे 48 हजारांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. विखे चौकात रामस्वामी मठासमोर सुधीर डहाळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी देव्हार्याातील चांदीची 450 ग्रॅम वजनाची घंटी, मूर्ती, छत्री असा 14 हजार 300 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला तसेच रसलपूर रोड चिमनाराम मंदिराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 900 ग्रॅम वजनाचे चांदीचे 32 हजार 400 रुपये किंमतीची छत्री लांबवली. अहिरवाडीसह रावेरात झालेल्या घरफोड्यांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धत्तीविषयी आश्चर्य व्यक्त होत असून गस्त वाढवण्यासाठी गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून पुढे आली आहे.