रावेर । विविध मागण्यांसाठी भारतातील सर्व औषध दुकाने मंगळवार 30 रोजी बंद ठेवण्याचा निर्णय ऑल इंडिया ऑर्गनाइजेशन ऑफ केमिस्टस अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो ने घेतला आहे. रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनदेखील या बंदमध्ये सहभागी होणार असल्याने मंगळवारी शहर व ग्रामीण मधील सर्व दुकाने बंद राहतील. हा बंद ऑनलाईन फार्मसी, केंद्रीय ई-पोर्टलच्या विचार मान्य नाही, ई-पोर्टल नितीमुळे भारतामध्ये औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता, औषध नियंत्रण कायद्यामुळे औषध विक्रेत्यांचे शोषण मान्य नाही, केंद्रीय औषध कायदा संशोधनामध्ये औषध विक्रेत्यांचा विचार व्हावा, देशातील 8.50 लाख कर्मचारी यामुळे अडचणीत येतील आदी मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
सदर बंदमुळे रुग्णांची गैरसोय होणार असल्याने संघटनेने दिलगिरी व्यक्त केली आहे. या बंदमध्ये सर्व औषध विक्रेत्यांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे, राष्ट्रीय सचिव सुरेश गुप्ता, अनिल नावंदर व रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनने केले आहे. तालुकाध्यक्ष संजय चौधरी, सचिव दीपक लोमटे, खजिनदार लखन सावळे, सहसचिव प्रवीण सरोदे, दिलीप जैन, गुणवंत भंगाळे, हेमंत अग्रवाल, अजय पाटील, तालुका कार्यकारणी सदस्य, राकेश चौधरी, विजय चौधरी, मधुकर पाटील, श्रीकांत वाणी, जयेश खारुल, विपुल अग्रवाल यांनी केले आहे.