रावेर शहरात चोरट्यांनी दोन मेडिकल्स फोडले

0

वाढत्या चोर्‍यांनी व्यावसायीकांमध्ये घबराट ; गस्त वाढवण्याची मागणी

रावेर- शहरात अज्ञात चोरट्याने दोन मेडिकल्स फोडून 16 हजार चारशे रुपयांची रोकड लांबवल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील माऊली हॉस्पिटलच्याखाली असलेले मुक्ताई मेडिकलमध्ये दोन दिवसांपासून डॉक्टर बाहेरगावी असल्याने औषध विक्री व इतर सामानाची कॅश मिळून पंधरा हजार 400 रुपये मेडिकल चालकाने ड्रॉवरमध्ये ठेवले होते. ही संधी साधत चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड लांबवली. मेडिकल्स चालक विजय मनोहर पाटील हे गुरुवारी सकाळी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

दुसर्‍या मेडिकलमध्ये चोरी
मुक्ताई मेडिकल्सपासून काही अंतरावर असलेल्या साईश्रद्धा मेडिकलचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील एक हजार रुपयांची रोकड लांबवली. वाढत्या चोर्‍यांमुळे व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली आह