रावेर शहरात नाले सफाईला सुरुवात

0

पावसाळ्यापूर्वीचे नियोजन ; लोकप्रतिनिधींनी केली पाहणी

रावेर- पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नाले तुंबण्याचे प्रकार होत असल्याने नागरीकांची गैरसोय न होण्यासाठी पालिकेने नालेसफाई तसेच गटारींच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. रावेर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील गटारी व नाले सफाईच्या कामास सुरुवात केली असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून कर्मचारी विविध भागातील तुंबलेल्या गटारी व नाले स्वच्छ करीत आहे.

लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
शहराच्या मध्य भागातून जाणार्‍या नागझिरी नदीच्या स्वच्छतेच्या कामाला रविवार, 27 रोजी रोजी सुरुवात झाली. नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, आरोग्य सभापती सादीक शेख नगरसेवक अ‍ॅड.सुरज चौधरी, नगरसेवक तथा गटनेता आसीफ मोहम्मद दारा मोहम्मद, नगरसेवक सुधीर पाटील, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र महाजन, नगरसेवक असद खान व सर्व नगरसेविका नगरसेवक व आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी व पंकज चौधरी उपस्थित होते.