रावेर शेतकरी संघाच्या चेअरमनपदी पी.आर.पाटील

0

रावेर- रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी पी.आर.पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन जिजाबराव चौधरी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. चेअरमन पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी अधिकारी आर.एस.ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या संचालक मंडळाची विशेष सभा झाली. त्यात संघाच्या चेअरमनपदी पी.आर.पाटील यांंची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी व्हा.चेअरमन आत्माराम कोळी, संचालक जिजाबराव चौधरी, यादवराव पाटील, सुर्यभान चौधरी, लक्ष्मण मोपारी, सचिन पाटील, किशोर पाटील, निलेश चौधरी, राजन लासुरकर, छायाबाई पाटील, अरुणा पाटील आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन यांचा सत्कार
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नवनिर्वाचित संघाचे चेअरमन पी.आर.पाटील यांचा सत्कार माजी आमदार अरुण पाटील, शिरीष चौधरी, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, रमेश पाटील यांनी केला.