राष्ट्रपती आज पुण्यात

0

पुणे । दादा वासवानी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास सुरुवात झाली असून, साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते साधू वासवानी मिशन, कॅम्प, पुणे येथे होणार आहे. हा सोहळा बुधवार, दिनांक 30 मे 2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. उपस्थितांना सकाळी 10.45 वाजता स्थानापन्न होण्याची विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. व्ही. राव यांच्यासह मानव व संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे संसदीय पक्ष अध्यक्ष एल. के. अडवाणी, पालकमंत्री गिरीश बापट आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

रमाई पुतळ्याचे अनावरण
देशातील पहिल्याच मातोश्री रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज बुधवारी (दि.30) सकाळी 10.45 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत. वाडिया महाविद्यालयासमोरील मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात रमामाई यांचा तब्बल साडे नऊ फुट उंचीचा गनमेटल पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.