राष्ट्रपती उद्या अहमदनगरमध्ये

0

पुणे : अहमदनगरमधील लष्कराच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूलला (एसीसीअँडएस) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी भेट देणार आहे. त्यांच्या हस्ते या संस्थेला प्रेसिडेंट्स स्टँडर्ड पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. एसीसीअँडएस संस्थेने आतापर्ंत बजावलेल्या कामगिरीचा यामुळे बहुमान होणार आहे.

या संस्थेतून आतापर्यंत असंख्य अधिकार्‍यांनी प्रशिक्षण घेतले असून, युद्ध व शांततेच्या काळात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. संस्थेचे प्रमुख मेजर जनरल प्रवीण दीक्षित राष्ट्रपतींचे स्वागत करतील. तसेच, राष्ट्रपतींच्या हस्ते हा बहुमान स्वीकारतील, असे सांगण्यात आले.