राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर; महाराष्ट्रातील ४४ पोलिसांचा होणार सन्मान !

0

नवी दिल्ली – दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर राष्ट्रपती पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी चार जणांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरीत ४० पोलिसांना पोलीस पदक पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

राष्ट्रपती पुरस्कृत जीवन रक्षा पदक ४८ बहादूर पोलिसांना देण्यात येत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील ५ पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोन पोलीस अधिकाऱ्यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, दोन पोलीस अधिकाऱ्यांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि एकास जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.