जळगाव– राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेलफेअर फंडमधून काल ‘फेस शिल्डचे’ वाटप करण्यात आले. कोरोनाच्या या लढ्यात चोहीकडून मदतीचा वर्षाव सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरनेही यात आपला खारीचा वाटा उचलला आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी जळगाव मेडिकल कॉलेजचे प्रभारी डीन डॉ.पोळे , डॉ.किरण पाटील ,जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील ,आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ.दिपक पाटील ,युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे तसेच महानगर डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.अशोक पाटील उपस्थित होते.