काँग्रेस-राष्ट्रवादीचे जिल्हाभरात ठिय्या आंदोलन

0

जळगाव : शासनाने जाहीर केलेल्या नोटबंदी धोरणाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोडकळीस निघाली असून दुष्काळाने ग्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांना अद्याप पावेतो अनुदान प्राप्त झाले नाही. शेतमालाला भाव नाही. जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प झाले असून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या गोठा शेड व विहीरींचे हजारो प्रस्ताव प्रलंबित आहेत, बेरोजगारांना काम नाही. केंद्रात भाजपाची सत्ता येवून जवळपास 3 वर्षाचा कालावधी झाला आहे. तसेच राज्यातही सत्ता बदल होवून भाजप-सेनेचा सरकार अडीच सत्तेवर आलेले आहेत. या कालावधीत केंद्रात व राज्यातील नेते मंडळींनी फक्त घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी महिला आदी लोकांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. शेतकर्‍यांची विमा योजना फक्त कागदावरच आहे. विमा योजनेचा योग्य फायदा मिळालेला नाही, ग्रामीण भागातील जनतेला मदतीचा हात देऊन संपुर्ण कर्ज माफी करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी तालुक्यातील ठिकाणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसिल व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

चाळीसगाव येथे आंदोलनात यांचा सहभाग
चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील तहसील कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन करून मागणींचे निवेदन नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी ठिय्या आंदोलन ठिकाणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रदीपदादा देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सोळंखे, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, अतुल देशमुख, दुध संघाचे प्रमोद पाटील, शशीभाऊ साळूंखे, जि.प.सदस्य मंगेश पाटील, किशोर पाटील, छायाबाई महाले, नगरसेवक भगवान पाटील, विजय जाधव, भैय्यासाहेब पाटील, अजय पाटील, इश्वरसिंग ठाकरे, जयसिंग भोसले, प्रदीप अहीरराव, राजेंद्र देशमुख, सुरेश पगारे, शिवाजी आमले, शुभम पवार, रतन साळुंखे, भुषण पाटील, जालम पाटील, कल्याण देशमुख, पिनल पवार, भाऊसाहेब जाधव आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली त्यात अडाणी अंबानी तुपाशी, शेतकरी आमचा उपाशी व अडाणी अंबानी शायनिंगमध्ये शेतकरी आमचा लाईनिंग मध्ये, गायगोठ्यांच झाल काय? आमदार-तहसीलदार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. शेवटी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन थांबविण्यात आले. ठिय्या आंदोलन हे तहसील व पोलीस ठाण्याच्या आवारातच असल्याने पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडला होता. यावेळी शहर पोलीस निरीक्षक आदीनाथ बुधवंत, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड,पोलीस मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

यावेळी पदाधिकार्‍यांनी तहसीलदार यांना जागेवर बोलवा व त्यांनी तालुकाभरात महाराजस्व अभियानांतर्गत 72 हजार दाखल्यांचे कसे वाटप केले. याबाबत माहीती द्यावी व मागील वर्षाचे दुष्काळी अनुदान त्यात फळबाग, ठिबक, बागायत अनुदान अद्याप पावेतो मिळालेले नाही. त्याच प्रमाणे कपाशीचे अनुदान देखील मिळाले नाही. कपाशीचे 22 हजार खातेदार शेतकरी असून त्यांना अद्याप 1 रूपया देखील अनुदान आले नाही. फळबागाचे खातेदार 4168 असून त्यापैकी 3138 खातेदारांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. म्हणजेच 75 टक्के अनुदान अद्याप मिळाले नसल्याने शासनाचा यावेळी निषेध करण्यात आला. कांदा अनुदान देखील 75 टक्के मिळालेले नाही. म्हणून शेतकर्‍यांनी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना चांगलेच धारेवर धरले. किशोर पाटील, प्रदीप अहीरराव, विजय जाधव,
ईश्वरसिंग ठाकरे यांची देखील यावेळी भाषणे झाली. तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी आपल्या भाषणातून शासनाचा निषेध करत हे शासन शेतकरी विरोधी असून आज पावेतो त्यांनी शेतकर्‍यांना काहीही दिले नाही असे सांगत 2 वर्षात चाळीसगाव तालुक्यामध्ये गोठाशेड, विहीरी अद्याप दिल्या नाहीत. शेतकर्‍यांना अनुदान नाही, असे सांगितले.

चोपड्यात काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन
चोपडा । केंद्रात भाजपाची सत्ता येवून जवळपास 3 वर्षाचा कालावधी झाला आहे. तसेच राज्यातही सत्ता बदल होवून भाजप-सेनेचा सरकार अडीच सत्तेवर आलेले आहेत. या कालावधीत केंद्रात व राज्यातील नेते मंडळींनी फक्त घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी महिला आदी लोकांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. शेतकर्‍यांची विमा योजना फक्त कागदावरच आहे. विमा योजनेचा योग्य फायदा मिळालेला नाही, असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी विधानसभाध्यक्ष अरुभाई गुजराथी यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलनवेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे माजी आमदार दिलीपराव सोनवणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष अमृतराव सचदेव, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र भाटीया, महिला तालुकाध्यक्ष भारती बोरसे, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, नगरसेवक जिवनभाऊ चौधरी, पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रदासभाई गुजराथी, प्रा.भरत पाटील, जि.प.सदस्य बाळासाहेब पाटील, अतुल ठाकरे, ललित बागुल, डिगंबर पाटील, प्रमोद पाटील, महेदद्र बोरसे, घनश्याम पाटील, अ‍ॅड.डी.पी.पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील, पं.स.सभापती सविता पाटील, नगरसेविका दिपाली चौधरी आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एरंडोल येथे तहसील आवारात धरणे
एरंडोल । नोट बंदीच्या निर्णयामुळे देशभरात अनेक निरपराध नागरिकांचे व शेतकर्‍यांचे बळी गेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशाही पद्धतीने शासन चालवत आहे तसेच केंद्र व राज्य सरकारला शेतकर्‍यांचे दुखः समजलेच नसुन प्रत्येक निवडणुकीत अच्छे दिन चे स्वप्न ते दाखवतात. असे प्रतिपादन आमदार डॉ.सतीष पाटील यांच्या मार्गदर्शनात एरंडोल तहसील कार्यालयाच्या आवारात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरणे आंदोलनात उपस्थित कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी तहसीलदार सुनिता जर्हाट यांना आमदार डॉ.सतीष पाटील यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांच्या सोबत विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ.सुभाष देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले, राजेंद्र शिंदे, रवींद्र पाटील, अमित पाटील, शेखर पाटील, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, अभिजित पाटील, रव.अहमद सैयद, केशरलाल पाटील, संदीप वाघ, डॉ.प्रशांत पाटील, हिरामण मराठे, पराग पवार, अफजलखान पठाण आदी शहर व परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे, पोलीस उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे, संदीप सातपुते, दिनकर मांडोळे, सुभाष धाबे आदींनी चोख बंदोबस्त राखला.

अमळनेरात नोटबंदी विरोधात आंदोलन
अमळनेर । देशाच्या अर्थिक व्यवस्थेतील काळापैसा नष्ठ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या. मात्र नोटा बंदी करतांना अर्थिक व्यवस्थेतील अडचणी लक्षात न घेतल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्या विरोधात मा आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नोटा बंदीचा निर्णय घेताना नोटा बंदी नंतर तयार होणार्‍या परिस्थितीचा कोणताही विचार केला नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. त्यात प्रामुख्याने कृषी विषयक आघाडी पूर्णतः मोड़कळीस आली नोटाबंदीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे जास्त हाल झालेत. शेतमालाचे भाव कमी झाल्याने शेतकर्‍यांना कमी भावात माल विकावा लागला शेत मंजुराना मजूरी देण्यासाठी हातात पैशे नसल्याने मजुरावरही रोजी रोटी गमविन्याची वेळ आली. सामान्य नागरिकाकड़े काळा पैसा नसतो शेतकर्‍यांचे उत्तपनाचे जे काही पैशे येतात ते राखीव असतात सरकारी बँका व पतसंस्थेवर निर्बंध घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असलेला हा वर्ग चिंतेत आला. ज्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला तो उद्देश बाजूला पडून सर्वसामान्य नागरिकांचे जिवन उद्ध्वस्त झाले आहे यासाठी हे निवेदन देवून जन आंदोलनाच्या माध्यमातून ही परिस्थिती सुधारन्यासाठी शासनाला भाग पाडण्यासाठी हे जन आंदोलन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, तिलोत्तमा पाटील, विक्रांत पाटील, भागवत पाटील, मुख्तार खटीक, योजना पाटील, रीता बाविस्कर, मिना पाटील, ललिता बैसाने, संदेश पाटील , सचिन पाटील, महेंद्र पाटील, नितिन वाणी, आरिफ पठान, कैलाश महाजन राजेंद्र यादव रविंद्र पाटील हिम्मत पाटील रामचंद्र पाटील विवेक पाटील गुलाब पाटील सुनील शिंपी नीलेश देशमुख आदि उपस्थित होते.

महिला व युवक कार्यकर्त्यांचे शहरातून थाळीनाद आंदोलन
आज चोपडा शहर काँग्रेसतर्फे भाजपासरकारच्या नोटबंदी व इतर निर्णयांविरोधात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. महिला व युवक कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात थाळीनाद करत चौक दणाणून सोडला. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील यांनी काळापैसा व भ्रष्टाचारला आमचाही विरोध आहे. परंतु ज्या हुकूमशाही पध्दतीने हे सरकार व पंतप्रधान काम करीत आहे ते संपुर्ण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला लांच्छनास्पद असुन संपुर्ण देशात मंदीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून विकासाला खिळ बसली आहे. अजुनही जनता पैशासाठी बँकांच्या रांगेत उभी असलेली दिसते. या विरोधात बोलल्यास देशद्रोही ठरवले जाते. अशा अडाणी व दडपशाही करणार्‍या सरकारचा आम्ही निषेध करतो, असे म्हणाले.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुरेशजी पाटील,(सुरेश पाटील), राजाराम पाटील, नगरसेविका सुप्रिया सनेर,जि.प. सदस्या निर्जलाताई भिल्ल, महिलाध्यक्ष वंदना पाटील, सुतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, राजू दगा कोळी, फातेमाबी पठाण,विनायकबापू, अनिल पाटील, हमीद पठाण, मुन्ना साळुंखे, गणेश पाटील,धनंजय पाटील, शिवराज पाटील, अजय जैस्वाल, कैलास सुर्यवंशी व महिलांसह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

पाचोरा येथे रास्तारोको
पाचोरा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज माजी आ.दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली जारगाव चौेफुली येथे रास्ता रोको करण्यात आले त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह ललित वाघ, खलील देशमुख, संजय वाघ, नितीन तावडे, अरुण पाटील, शालीग्राम मालकर, शशिकांत चांदीले, दीपक पाटील,अझरखान, सुचेता वाघ ,सनी वाघ, राजेंद्र वाघ, बंटी माळी, भूषण वाघ, योगेश कुमावत, दीपक शिंदे, नामदेव पाटील, तुकाराम पाटील, रघुनाथ पवार, रमेश काटे, आनंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

पहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन
पहूर । येथील बस स्थानक परिसरात आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नोटबंदी विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर आंदोलन केल्यामुळे वाहतुक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. नोटबंदीच्या निर्णयामुळे जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीतर्फे सकाळी 11 वाजता जळगाव-औरंगाबाद महामार्गावर आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य संजय गरुड, सरपंच प्रदीप लोढा, शाम सावळे, विवेक जाधव, योगेश भंडागे, विजय पांढरे, डी.के.पाटील, भास्कर पाटील, अशोक देशमुख, भगवान पाटील, प्रा.शरद पाटील, सुरेश सोनवणे, किशोर पाटील, भागवत पाटील, भिका पाटील, राजू जेंटममेन, राजू चौधरी यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जामनेरचे पो.नि. नजीर शेख, पहूरचे सपोनि मोहन बोरसे यांच्यासह आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.