पुणे । शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी घेण्यात आलेल्या पुस्तकामध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याबाबत तसेच या पुस्तकांच्या खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळेस नगरसेवक विशाल तांबे, राकेश कामठे, नंदा लोणकर, वासंती काकडे, अशोक राठी, शशिकला कुंभार, भोलासिंग अरोरा, मिलिंद वालवडकर, डॉ. दत्ता गायकवाड, महेश हांडे, मनोज पाचपुते, किशोर कांबळे, निलेश वरे, फहिम शेख, जावेद ईनामदार,नितिन राठोड, नितीन रोकडे, विपुल म्हैसुरकर, रोहन पायगुडे, अतुल तरवडे, विक्रम मोरे, शरद दबडे, मोरेश्वर चांदेरे, सागरराजे भोसले, गजानन लोंढे,निखिल बटवाल, विकी वाघे, सुरज लाटे, युसुफ शेख, अजिंक्य पालकर, संजय गायकवाड, रोहित राठोड, तुकाराम शिंदे, महेश शिंदे उपस्थित होते.
चौकशी करणे आवश्यक
महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या भारतीय विचार साधना या संस्थेकडून पुस्तके खरेदी केली आहेत. बाजारात 20 रुपयाला मिळणारी ही पुस्तके 50 रुपये प्रती दराने खरेदी केली आहेत. ‘बाल नचिकेता’ या पुस्तकात मीलन, कोमार्यभंग आणि कामातुर यांसारख्या शब्दांचा भडीमार करण्यात आलेला आहे. या पुस्तकांत विशिष्ट पौराणिक व धार्मिक कथाचा भर आहे यातून मुलांवर विशिष्ट विचारधारेचा संस्कार लादण्याचा सरकारचा घाट असल्याचे सांगत याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिक्षण आयुक्त विपिन शर्मा यांना निवेदन देण्यात आले.