उद्या निरंजन डावखरे भाजपात प्रवेश करणार

0

मुंबई- विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व.वसंत डावखरे यांचे पुत्र आमदार निरंजन डावखरे हे भाजपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या प्रवेश करणार आहे. ते आगामी काळात कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान डावखरे यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.

डावखरे हे भाजपात जाणार असल्याने ठाण्यात भाजपला नवीन उर्जा मिळणार आहे.