राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक ननावरे, मोटे शिवसेनेत

0

शिवसेना पक्षप्रमुखांच्याहस्ते पक्षात स्वागत

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे व किरण मोटे यांनी बुधवारी मुंबईत मातोश्री निवासस्थानावर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थित होते.

आगामी निवडणुकीची तयारी
जितेंद्र ननवरे 10 वर्ष पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी संत तुकारामनगर-कासारवाडी या प्रभागातून मिळाली होती. तसेच, किरण मोटे हे कासारवाडी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून 2012 च्या निवडणुकीत निवडून आले होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने हे प्रवेश महत्वाचे मानले जात आहेत.