जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा रवींद्र पाटील यांच्यावर टाकण्यात आली असून विलास पाटील यांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज राज्यातील विविध जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. यात राष्ट्रवादीच्या जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी रवींद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी विलास पाटील यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर महानगराध्यक्षपद मात्र जाहीर करण्यात आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षांतर्गत जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष पदासाठी २०१८-२०२० पर्यंतच्या निवडणूका पार पडल्या असून यापूर्वीच २७ जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत आणि आज १४ जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जयंत पाटील यांनी जाहीर केल्या.
नियुक्त्या जाहीर करण्यात आलेले जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष खालीलप्रमाणे – ठाणे शहर – आनंद परांजपे, कार्याध्यक्ष – संजय वढावकर, ठाणे ग्रामीण – जिल्हाध्यक्ष – दशरथ तिवरे, कल्याण-डोंबिवली -जिल्हाध्यक्ष- रमेश हनुमंते, उल्हासनगर – जिल्हाध्यक्ष -आमदार श्रीमती ज्योती कलानी, भिवंडी शहर – जिल्हाध्यक्ष – खलिद गुड्डू, कार्याध्यक्ष – अनिल फडतरे, पुणे शहर – जिल्हाध्यक्ष – चेतन तुपे, सांगली शहर – संजय बजाज, कोल्हापूर शहर – जिल्हाध्यक्ष – आर.के.पोवार, कोल्हापूर ग्रामीण-जिल्हाध्यक्ष – ए.वाय.पाटील, कार्याध्यक्ष -राजेंद्र पाटील-यड्रावकर, सोलापूर शहर – जिल्हाध्यक्ष -भारत जाधव, कार्याध्यक्ष – संतोष पवार, जळगाव ग्रामीण – जिल्हाध्यक्ष – रवींद्र भैय्या पाटील, कार्याध्यक्ष – विलास पाटील; अहमदनगर शहर -जिल्हाध्यक्ष- माणिकराव विधाते, परभणी ग्रामीण-जिल्हाध्यक्ष- आमदार अबुल्ला खान अ.लतिफ खान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्राणी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष- आमदार ख्वाजा बेग.