धुळे । राष्ट्रवादीच्या कॉग्रेसच्या माजी महापौर जयश्री आहिरराव यांच्यसह चार जणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र आत तिला पूर्णविराम लागला आहे. राष्ट्रवादीमधील काही नगरसेवक देखील भाजपच्या वाटेवर असून धुळ्यात राजकीय भूकंप होणार असे वृत्त जनशक्ती छापले होते. यावरून ते सत्यात देखील उतरल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकत माजी महापौर आहिरराव त्यांनी भाजप मध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. तूर्तास त्याच्या सोबत प्रवेश घेणार्या दिग्गज आजी-माजी नेत्यांच्या प्रवेश सध्या लांबणीवर गेला आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश
प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ओबीसी मोर्चाचे विजय चौधरी, धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, सरचिटणीस हिरामण गवळी, नगरसेवक फारूक शहा, फिरोज लाला, ओबीसी प्रदेश सरचिटणीस नरेद्र कापडणीस, ओबीसी मोर्चा धुळे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, अमोल धामणे, यशराज देवरे आदी उपस्थित होते .