राष्ट्रवादीच्या संपर्कात कधीही नव्हतो: खडसे

0

ठाणे: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना यंदा विधानसभेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला शेवटचे काही तसाच शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे खडसे बंडाच्या पावित्र्यात असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांनी ‘खडसे हे गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या संपर्कात आहेत,’ असा गौप्यस्फोट केला आहे. पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान शरद पवार यांच्या व्यक्तव्यावर खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा खडसे यांनी फेटाळून लावली आहे. ‘तीन महिन्यांत काय, तीन वर्षांत कोणत्याही पवारांशी माझी भेट झालेली नाही. भाजप सोडण्याचा असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही आणि घेण्याची शक्यताही नाही,’ असे खडसे यांनी स्पष्ट केले.