राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्षपदी शंकर बैसाने

0

राष्ट्रवादीचे संघटना भक्कम होत असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा
अमळनेर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी शंकर बंडू बैसाणे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. राष्ट्रवादीच्या सर्व विभाग व आघाड्यांवर जनसंपर्क असलेले क्रियाशील पदाधिकारी त्यांच्या नियुक्त होत असल्याने राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत होत असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यानी व्यक्त केली.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
शंकर बैसाणे हे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते असून उत्तम जनसंपर्क त्यांचा आहे. त्यांच्या पत्नी ललिताताई बैसाणे यांनी अमळनेर पं.स.चे सभापतीपद देखील भूषविले आहे. त्यांचे कार्य पाहूनच हि संधी त्यांना मिळाली असून सदर नियुक्तीबद्दल जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी मंत्री आमदार सतिश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख भागवत पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील मुक्तार खाटीक, मार्केट संचालक विजय पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.