राष्ट्रवादीच्या ‘स्वाद’ उपक्रमाला प्रारंभ

0

जळगाव । राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील महिला गटांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी दर रविवारी दुपारी 4 ते 10 या वेळेत स्वाद खान्देश उपक्रमांतर्गत स्टॉल लावण्यात आले होते. महिला बचत गटा च्या वतीने विविध खाद्य पदार्थाची मेजवानी विक्री साठी ठेवण्यात आले आहे. जळगाववासियांनी सायंकाळी व रात्रीपर्यत स्टॉला भेटी देण्यासाठी गर्दी केली होती. राष्ट्रवादी महिला सेल च्या वतीने प्रथमच असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्षभर जिल्ह्यातील बचत गट प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहे. आकाशवाणी चौकाला दर रविवारी यात्रेचे स्वरूप आले. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या सह जिल्ह्यातील विविध पदाधीकारी ,अधिकारी भेट देऊन आपली उपस्थिती नोंदवित आहे.

या बचत गटाचा सहभाग
जिल्ह्यातील तसेच शहरातील बचत गटांनी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या आयोजित प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविला आहे. संताजी जगनाडे तेली समाज महिला मंडळ, साईराम गृह उद्योग , निर्मल सहायता बचत गट, स्वामींनी महिला बचत गट, स्वयंसिद्धा महिला बचत गट, झेप महिला बचत गट, भरारी महिला बचत गट, विशाल महिला बचत गट, देवाशी महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट, तनिष्का महिला बचत गट ,श्रुष्टि महिला बचत गट, मासूम महिला उद्योग, अशा एकूण 13 बचत गटांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला कायम रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे.

रविवार खाऊ गल्लीचे स्वरूप
खान्देशी पदार्थात पुडाच्या पाटोड्या, वरणबट्टी वांग्याची भाजी, गुळाचा शिरा, गव्हाची खीर ,सिंधी पापड ,पुरण पोळी, इडली, वडा संभार, पुणेरी पोहे, ताकाचा मठ्ठा, कैरीचे लोणचे, शाकाहारी तसेच मांसाहारी खान्देशी इतर पदार्थ प्रदर्शनामध्ये विक्रीला ठेवण्यात आले आहे. जळगाव शहरातील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोकाकाच्या वतीने करण्यात आले आहे. महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव कल्पना पाटील, महानगराध्यक्षा मीनल पाटील, उपाध्यक्ष मंगला पाटील, युवती अध्यक्ष डिंपल पाटील यांच्यासह सोनाली देऊळकर, शकुंतला धर्माधिकारी तसेच जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आहे.