पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभावे याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती शहराध्यक्ष चेतन तुपे व रविंद्र माळवदकर यांच्या हस्ते करण्यात आली. महाआरतीचे संयोजन देवेंद्र देशकर व राजेंद्र आलमखाने यांनी केले होते. यावेळी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, विनायक हनमघर, गणेश नलावडे, रजनी पांचगें, मछिंद्र उत्तेकर, जितेंद्र टकले, सुरेश खाटपे, राजाभाऊ पोटे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कसबा विधानसभा मतदार संघाच्यावतीने टिळक रोडवरील पक्षाच्या कार्यालयात शहराध्यक्ष चेतन तुपे व राजेंद्र गिरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कॅम्प भागातील बी. जे. मेडिकल मैदानाच्या कडेला वृक्षारोपण कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विनायक हनमघर, कार्याध्यक्ष गणेश नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शरद पवार संयमी नेतृत्व
राजकारणात असूनही कला, क्रीडा, कृषी, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात ते रममाण होतात. आपल्यावर होणार्या आरोपांना ते अत्यंत संयमाने उत्तरे देतात. खर्या अर्थाने पवारसाहेब हे संयमी नेतृत्व आहे, असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी शंकर पवार यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यानिमित्ताने छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथील काशीराम सोलनकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. प्राचार्य अजित अभंग, चेतन तुपे, दिलीप तुपे, अनिल तुपे, उपमुख्याध्यापक एस. बी. कुलकर्णी, डी.डी. सुर्यवंशी, जे.एन. दाभाडे, एम.वाय. कांबळे, लालासाहेब खलाटे उपस्थित होते.